ज्येष्ठ समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर यांचे दु:खद निधन

पुणे: पोलीसनामा अॉनलाईन 

ज्येष्ठ समीक्षक आणि कुसुमाग्रज यांचे बंधू डॉ. के. रं. शिरवाडकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. राहत्या घरी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रा. केशव रंगनाथ शिरवाडकर हे साहित्यसमीक्षक असून ते मराठीत वैचारिक लेखन करत होते. मराठी साहित्यिक (कुसूमाग्रज) वि.वा. शिरवाडकरांचे हे धाकटे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. त्यांच्या दोन मुली अमेरिकेवरून आल्यानंतर बुधवारी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रा. केशव रंगनाथ शिरवाडकर यांची साहित्य संपदा :
आपले विचारविश्व, तो प्रवास सुंदर होता : कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर – जीवन आणि साहित्य) (चरित्रग्रंथ), मर्ढेकरांची कविता : सांस्कृतिक समीक्षा, विल्यम शेक्सपिअर – जीवन आणि साहित्य संस्कृती, समाज आणि साहित्य, सार गीतारहस्याचे, साहित्यातील विचारधारा. असे अनेक पुस्तके त्यांनी लिहली आहेत.

प्रा. केशव रंगनाथ शिरवाडकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार संपादन: 
महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरवलेल्या पहिल्या साहित्य समीक्षकांच्या संमेलनाचे अध्यक्षपद (२९-३० नोव्हेंबर, २०१२) , महाराष्ट्र सरकारकडून तत्त्वज्ञान व मानसशास्त्रविषयावरील पुस्तकासाठीचा ना. गो. नांदापूरकर पुरस्कार (‘संस्कृती, समाज आणि साहित्य’ या पुस्तकाला). याव्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.