डिलीट झालेल्या फाईल्स पुन्हा डाउनलोड करता येणार!

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

व्हाॅट्सअपने अॅंड्राॅईड वापरकर्त्यांसाठी एक नवे फिचर आणले आहे. फोनमधून डिलिट झालेल्या मीडिया फाईल्स पुन्हा डाउनलोड करणे ही वापरकर्त्यांची मोठी समस्या होती. मात्र या नविन फिचरमुळे ही समस्या दूर होणार आहे. फोनमधून डिलीट झालेल्या फाईल्स पुन्हा डाउनलोड करता येणार आहेत.

एखाद्या वापरकर्त्याकडून फोनमधील फोटो, GIFs, आॅडिआे, व्हिडीअाे किंवा यांसारख्या इतर फाईल डिलीट झाल्या असतील तर त्या आता पुन्हा डाउनलोड करता येतील. ज्या व्यक्तिकडून तुम्हाला ही फाईल आली असेल, त्या चाटमधून डिलीट केलेली फाईल मिळेल.

WABetalnfoच्या माहितीनूसार याअगोदर अॅंड्राॅईड वापरकर्ते मागिल फक्त 30 दिवसांपर्यंतचा जुना डेटा डाउनलोड करु शकत होते. याबरोबरच पाठवलेली मीडिया फाईल डिलीट केली तर ती सर्व्हरवरुन गायब होत असे. मात्र नविन फिचरमुळे डिलीट झालेल्या फाईल्सही उपलब्ध असणार आहेत. सर्व फाईल्स ‘एंड टू एंट एनक्रिप्टेड’ असणार आहेत. त्यामुळे फाईल्स सर्व्हरवर ठेवल्यानंतरही त्यांची सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे काळजी घेतली जाणार आहे.