डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पिपरी : पोलीसनामा ऑनलाईन

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातलत डॉक्टरांना मारहाण केली होती. य घटनेत रुग्णालयातील डॉक्टर जखमी झाले होते. ही घटना शुक्रवारी (दि.23) रात्री पावणे दहाच्या सुमारास पिंपरी येथील डि.वाय. पाटील रुग्णालयात घडली होती. या प्रकरणी आज (शनिवार) दुपारी पिंपरी पोलीस ठाण्यात २० वर्षीय दोन अनोळकी मुले आणि दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. आदित्य कार्तीक पांडियन (वय-२९, रा. उद्यमनगर, पिंपरी, मुळ रा. राजकोट गुजरात) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी चिंचवड येथील केतन गायकवाड (वय- २७) तरुणावर डिवाय पाटील रुग्णालयातील पाचव्या मजल्यावर असलेल्या अतीदक्षता विभागात उपचार सरु होते. परंतू शुक्रवारी सायंकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचे सांगत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून डॉ. पांडियन यांना मारहाण केली. या मारहाणीत डॉ. पांडियन यांना दुखापत झाली. या घटनेची माहिती पिंपरी पोलिसांना समजताच पोलिसांचे एक पथक रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी नातेवाईकांना शांत केले होते.

या घटनेचा निषेध करत रुग्णालयातील डॉक्टरांनी आज रुग्णालयाच्या गेटवर आंदोलन केले होते.

रुग्णालयातील डॉक्टरांनी आज रुग्णालयाच्या गेटवर आंदोलन केले