डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गिरीश महाजनांनी धरला लेझीमवर ठेका

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन

देशभरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सहभागी झाले. त्यांनी या मिरवणुकीत लेझीम खेळत उपस्थितांची मने जिंकले.

मागील पंचवीस वर्षांपासून गिरीश महाजन हे जामनेर मतदार संघात आयोजित करण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आबेंडकर जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होत असतात. यंदा देखील गिरीश महाजन नेहमी प्रमाणे कार्यकर्त्यासह सहभागी झाले होते. यावेळी लेझीमच्या तालावर त्यांनी ठेका धरला. त्यानंतर त्यांनी सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या.