देशाच्या गृह, संरक्षण आणि कायदा विभागाच्या वेबसाईट हॅक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

देशाच्या गृह, संरक्षण आणि कायदा मंत्रालयाच्या वेबसाईट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे केंद्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तिन्ही विभागाच्या वेबसाईट चायनिज हॅकर्सकडून हॅक झाल्याचा दावा आयटी तज्ज्ञांकडून केला जात आहे.

देशाच्या गृह, संरक्षण आणि कायदा विभागाच्या वेबसाईट हॅक झाल्याने सर्वचजण पेचात पडले आहेत. वेबसाईट हॅक झाल्या असून त्यावर चायनिज अक्षरामध्ये काहीतरी लिहीलेले दिसत आहेत. त्यामुळे या दोन्ही वेबसाईट चायनिज हॅकर्सकडून हॅक झाल्याचे आयटीमधील तज्ञांचे मत आहे. वेबसाईट हॅक झाल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांनी दिली असुन वेबसाईट पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न झालु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यापुढे भविष्यात अशी घटना घडू नये म्हणुन उपाययोजना करणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.