देशाबाहेर पळालेली व्यक्ती याचिका करतेच कशी : उच्च न्यायालय

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
झाकीर नाईकसारख्या व्यक्तीने दाखल केलेली याचिका ऐकण्यात आम्हाला स्वारस्य नाही,’ अशा कडक शब्दांत उच्च न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईकने मुंबई उच्च न्यायालयात त्याच्याविरोधात दाखल केलेले आरोपपत्र रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. मात्र देशाबाहेर पळून गेलेली व्यक्ती अशाप्रकारे याचिका दाखलच कशी करु शकते? असा प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळण्याचे संकेत दिले.

या याचिकेवरील सुनावणी याचिका कर्त्यांचे मुख्य वकील अनुपस्थित असल्याने उच्च न्यायालयाने 23 एप्रिलपर्यंत तहकूब केली. या याचिकेला राज्य सरकार आणि ईडीसह एनआयएनेही जोरदार विरोध केला. उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

आयआरएफ या संघटनेवर बंदी घातल्यानंतर तपास यंत्रणांनी त्यांचे संकेतस्थळ, समाज माध्यमावरील खाती, यू ट्यूब वाहिनी हे सर्व काही बंद करून केले. तसेच देशभरात १७ ठिकाणी छापे टाकून या संघटनेशी संबंधित अनेकांना अटकही केली.