नऊवारी साडी नेसून तेरा हजार फुटांवरुन स्कायडायव्हिंग जम्प

ADV

पोलिसनामा ऑनलाईन :
पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून अाकाशात झेप घेणाऱ्या स्कायडायव्हिंग या साहसी खेळात देशाचे नाव उज्वल करणाऱ्या पुण्याच्या शीतल महाजन-राणे यांनी नऊवारी साडीचा पेहराव करुन थायलंड मध्ये 13 हजार फुटांवरुन स्कायडायव्हिंग उडी मारली.

स्कायडायव्हिंग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत पद्यश्री शीतल महाजन यांनी अातापर्यंत 17 राष्ट्रीय अाणि सहा जागतिक विक्रम करुन या क्षेत्रात भारतीय पहिली महिला खेळाडूचा मान पटकाविलेला अाहे. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून साडीला विशेष महत्व असून साडीचे अनेक प्रकार देशभरात अाहे. महाराष्ट्राचा सार्थ अभिमान असलेल्या शीतल यांनी नऊवारी साडी नेसून स्कायडायव्हिंग करण्याचे ठरविले. मराठी असल्याचा अभिमान व्यक्त करणे अाणि महिला काेणत्याही क्षेत्रात कमी नसून सर्व क्षेत्रात अापल्या कर्तृत्वाचा ठसा सक्षमरित्या उमटवू शकतात हे या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना शीतल महाजन यांनी व्यक्त केली.
“अातापर्यंत जगात काेणीच साडी नेसून स्कायडायव्हिंग केले नाही. अशाप्रकारचे धाडस अापण करावे अाणि मराठी बाणा दाखवून द्यावा असे मला वाटले.” त्यानुसार पहिल्यांदाच महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या महिलांच्या नऊवारी साडीचा पेहराव करुन थायलॅंड देशात स्कायडायव्हिंग सेंटर येथे 13 हजार फुटांवरुन विमानातून अाकाशात भरारी घेतली. अातापर्यंत शीतल महाजन यांच्या एकूण 705 पॅराशूट जंम्प पूर्ण झालेल्या अाहेत.