नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेने मारली बालकनीतून उडी

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

मुंबईमधील नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीने छेडछाडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी  इमारतीवरुन उडी मारल्याची घटना ताजी असतानाच आज पुणे शहरामध्ये देखील एका महिलेने इमारतीच्या बालकनीतून उडी मारल्याची घटना रहाटणी फाटा येथे घडली आहे.

अज्ञात इसनाने घरात घुसून महिलेवर आत्याचाराचा प्रयत्न केला असता भितीपोटी महिलेने घराच्या बालकनीतून थेट चार गाडीवर उडी मारली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तीच्या पायाला दुखापत झाली आहे. सदर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला घरात एकटी असल्याचे पाहत अज्ञात इसमाने काही तरी बनाव रचत घरात प्रवेश केला. व जबरदस्ती करत आत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आत्याचार करणाऱ्या अज्ञात इसमापासून स्वताःचा बचाव करण्यासाठी महिलेने घराच्या बालकनीतून थेट चारचाकीवर उडी मारली. या घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.