नव्या आर्थिक वर्षात होणार ‘हे’ बदल

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत. दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक तसेच अन्य वस्तूंच्या किंमतीत यामुळे बदल होणार आहेत.

नव्या आर्थिक वर्षातील नवे बदल काय?
शेअर विक्रीवर दीर्घकालीन भांडवली नफा, प्राप्तीकरावर अतिरिक्त एक टक्के उपकर भरावा लागणार, ज्येष्ठ नागरिकांना 50 हजारापर्यंत व्याजावर प्राप्तीकरात सूट, ई-वे बिल प्रणालीला प्रारंभ, मुद्रांक दर मागच्या वर्षी एवढाच राहणार.

कोणत्या वस्तू महागणार?
मोबाईल आणि मोबाईल अॅक्सेसरीज, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू, फ्रुट ज्युस आणि व्हेजिटेबल ज्युस, परफ्युम, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरिज, टूथपेस्ट, टूथ पावडर, सौंदर्यप्रसाधने, कार आणि टू व्हीलर, अॅक्सेसरीज, ट्रक आणि बसचे टायर, चप्पल आणि बूट, सिल्क कपडा, इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड, फर्निचर, घड्याळं, एलसीडी, एलईडी टिव्ही, दिवे, खेळणी, व्हीडीओ गेम, क्रीडा साहित्य, मासेमारी जाळं, मेणबत्त्या, गॉगल, खाद्यतेल, टाईल्स, सिरॅमिकच्या वस्तू, शिक्षण आणि आरोग्यावरील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, प्रत्येक बिल महागणार.