नारंगी येथील एकविरा मंदिरात चोरी करणारा सीसीटीव्ही मध्ये कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

वसईजवळील नारंगी येथील मंदीरा चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा प्रकार 12 एप्रिलला पहाटे तीनच्या सुमारास घडला आहे. सीसीटीव्हीमध्ये चोरटा गाभा-यात असणा-या एका खिडकी वाटे मंदिरात शिरताना आणि बाहेर जाताना दिसत आहेत.

चोरट्यांनी मंदीरातील देवीच्या गळ्यातील दागिने आणि दानपेटी चोरुन नेताना चोरटा दिसत आहे. या चोरट्याचा आणखी एक साथिदार असण्याची शक्यता आहे. चोरट्याने देवीच्या गळ्याती दागिने हिसा मारुन चोरल्यानंतर हे दागिने त्याने बाहेर उभ्या असलेल्या व्यक्ती दिले. तसेच दानपेटी देखील बाहेरील चोरट्याकडे दिली.