निर्व्यसनी हाच निरामय जीवनशैलीचा कणा : डॉ. अजय चंदनवाले 

पोलीसनामा ऑनलाईन

निर्व्यसनीपणा हाच निरामय जीवनशैलीचा कणा आहे. म्हणूनच माणसाने आपल्या आरोग्यासाठी निर्व्यसनी रहाण्याबरोबरच नियमित व्यायाम, संतुलित आहार, ध्यानधारणा यांचा स्वीकार केला पाहिजे. असा सल्ला बी. जे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सोमवारी दिला.

सोमवारी मौखिक आरोग्यादिनानिमित्त ससून सर्वोपचार रूग्णालयात पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर डॉ. चंदनवाले म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकानुसार शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक आणि सामाजिक सुस्थिती म्हणजे आरोग्य होय. त्यामुळे नियमित व्यायाम, संतुलित आहार, ध्यानधारणा आणि निर्व्यसनीपणा यांचा स्वीकार केला पाहिजे. ससून रूग्णालयातर्फे नेहमीच प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी जनजागृति केली जाते. या पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून देखील निर्व्यसनीपणाचा संदेश जनमानसात पोहचेल असा विश्वास आहे.

यावेळी डॉ. विवेक पाखमोडे, डॉ. समीर खैरे, डॉ. संगीता अग्रवाल, डॉ. सोमनाथ सलगर, दंतरोग विभागाचे सर्व निवासी डॉक्टर, अध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.