पतंगराव कदम यांची प्रकृती चिंताजनक

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काल त्यांची तब्येत स्थिर असल्याचे वृत्त होते परंतु आज अचानक प्रकृती खालावली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आज त्यांची तब्येत अचानक खालावल्याने भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत दादा पाटील , हरिभाऊ बागडे तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भेटण्यासाठी गेल्याचे सूत्रांकडून समजते.