पतंगराव यांच्या अंत्यदर्शनासाठी नेत्यांची गर्दी

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम (वय ७३) यांचे शुक्रवारी रात्री प्रदीर्घ आजारानंतर मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव आज, शनिवारी पुण्यातील निवासस्थानी आणण्यात आले.’सिंहगड’ या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

पतंगराव कदम यांचे पार्थिव आज सकाळी ६.३० वाजता त्यांच्या बीएमसीसी कॉलेजसमोरील सिंहगड बंगला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार प्रणिती शिंदे, डॉ. के. एच. संचेती, डॉ. विश्वनाथ कराड, बुधाजीराव मुळीक, विद्या येरवडेकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, कुलगुरू नितीन करमळकर, पालकमंत्री गिरीश बापट, उल्हास पवार, विठ्ठल मणियार, आमदार जगदीश मुळीक यांच्यासह शिक्षण, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पुण्यानंतर त्यांचे पार्थिव सांगलीला नेण्यात येणार असून सोनहिरा कारखान्यात दुपारी दोन वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.