पुण्यात चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन
मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. श्रद्धा वेलनेस मसाज सेंटर (आॅफिस सेंटर 17,18,19 सनश्री वुडस् बिल्डींग सं. नं 22,2 बी कोंढवा. बु. हवेली पुणे) या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय चालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्पा मालक पुनम कुंदन जहांगीर, फाैजिया उर्फ झेबा अंजुम शेख (वय-43 वर्षे, धंदा नोकरी, रा. उन्ड्री पिसोळी प्लॅट, नं 104 साई श्रद्धा अपार्टमेंट कोंढवा पुणे( रिसेपनिस्ट), मंजुर समशुद्दीन आलम (वय- 30 रा.डी,6 न्याती टाॅवर निको गार्डन विमाननगर पुणे. स्पा हेड मॅनेजर, यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार कोढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस नाईक नितीन तेलंगे यांना आपल्या गुप्त खबऱ्या मार्फत मसाज सेंटरच्या नावाखाली वेलनेस व स्पा सेंटरमध्ये थायलंड व भारतीय मुलींना नोकरीचे व जादा पैशाचे अमिष दाखवून अवैध्य वेश्याव्यावसाय करुन घेत असल्याची माहिती मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी श्रीद्धा वेलनेर व स्पा सेंटर आॅफिस नंबर 17,18,19 सनश्री व वुडस् बिल्डींग सं. नं 22,2 बी कोंढवा. बु. हवेली पुणे. या ठिकाणी चालत असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यावसाया बाबत खात्री करुन छापा टाकला असता थायलंडच्या 2 सज्ञान व मिझोरम राज्याची 1 व महाराष्ट्रीयन 1 अशा चार मुलींची वेश्याव्यावसायातुन सुटका केली

वरील कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे,  सहाय्यक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल भालेकर,नितिन तेलंगे, सहाय्यक पोलीस फाैजदार शेलार, पोलीस हवालदार घोगरे, पोलीस नाईक कचरे, पोलीस हवालदार येळे, महिली पोलीस नाईक ठोंबरे, महिला पोलीस शिपाई कागणे, महिला पोलीस नाईक रुपाली चांदगुडे, महिला पोलीस नाईक शेवाळे, व सहकाऱ्यांनी केली.