पुण्यात सॅनिटरी पॅड विल्हेवाटीसाठी इन्सिलरेटर मशिन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

सॅनिटरी पॅडचा वापर वाढत असून त्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान राज्यातील सर्वच महापालिकांसमोर आहे. पुणे महापालिकेने प्रत्येक प्रभागात पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी गेल्या चार वर्षांत शहरातील बारा प्रभागांमध्ये इन्सिलरेटर मशिन बसविण्यात आली असून त्याद्वारे दिवसाला दहा हजारांहून अधिक पॅडची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी पॅडचा वापर वाढावा, यासाठी पुणे महापालिका प्रयत्न करते आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींना मोफत पॅडचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटीबाबतही पुणे महापालिका जागरूक असून यासाठी पाच वर्षांपूर्वी शहरातील पहिला सार्वजनिक इन्सिलरेटर प्रकल्प वर्तक उद्यानात सुरू केला शहरातील काही भागातील शाळा, कॉलेज, हॉस्टेल आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील पॅडची विल्हेवाट या प्रकल्पात लावण्यात येते. या प्रकल्पाला मिळालेला प्रतिसाद पाहून महापालिकेने गेल्या चार वर्षांत अन्य बारा ठिकाणी हा प्रकल्प सुरू केला आहे.सुरुवातीला महिलांचा प्रतिसाद कमी होता, परंतु अलीकडे प्रत्येक प्रकल्पामध्ये दिवसाला सुमारे ७५० ते ९०० सॅनिटरी पॅड जमा होतात येत्या वर्षभरात महापालिकेने सर्व प्रभागांमध्ये ही मशिन्स बसविण्याचे नियोजन केले आहे

‘स्वच्छ’ संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, शहरात दररोज तयार होणाऱ्या कचऱ्यातील डायपर आणि सॅनिटरी पॅडचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत दुप्पटीने वाढले आहे . रोजच्या कचऱ्यात सॅनिटरी पॅडचे प्रमाण ४२ टन आहे. शहरातील एकूण कचऱ्यातील डायपर आणि पॅडचे प्रमाण तीन टक्के आहे. महिन्याला वीस लाख पॅड कचऱ्यात फेकले जात आह