पुतळ्यांची चिंता करू नका, जिवंत माणसांची चिंता करा : सुनील देवधर

पुणे पोलीसनामा ऑनलाइन :

त्रिपुरामध्ये लेलीन पुतळा पाडणे ही चुकीची घटना असून जेव्हा ही घटना घडली.त्यावेळी माणिक यांचे सरकार होते.आमचे सरकार नव्हते.पुतळ्यांची चिंता करू नका, जिवंत माणसांची चिंता करा.असा सल्ला त्रिपुरा च्या भाजप विधानसभा निवडणुकीचे शिल्पकार सुनील देवधर यांनी पुण्यात आयोजित पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापा प्रसंगी मांडली.यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे,प्रतिष्ठाण चे अध्यक्ष महेंद्र बडदे,सरचिटणीस दिगबर दराडे आणि सुकृत करंदीकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी सुनील देवधर म्हणाले की,त्रिपुरात लेनिन घटनेनंतर काही ठिकाणी त्याचे तीव्र पडसाद उमटले. तर काही ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते भाजपचा टिशर्ट घालून हिंसा करित असल्याचे घटना घडल्या आहेत.त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश देखील आहे.
ते पुढे म्हणाले की,त्रिपुरा निवडणुकीत भाजप ला मिळालेल्या यशामुळे कम्युनिस्ट पक्षा सह इतर पक्षातील नेते देखील भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत.मात्र सद्याच्या घटना लक्षात घेता. सहा महिने पक्षात प्रवेश बंद केला करण्याचा निर्णय घेतला असून पूर्ण चौकशी करूनच प्रवेश दिला जाईल.असे त्यांनी सांगितले.

त्रिपुरा निवडणुकी मागील यशा विषयी देवधर म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता नसती तर आम्ही जिकलोच नसतो.त्यांच्या चार सभा झाल्या आणि मागील तीन वर्षांत पक्षाची कामे जनते पर्यँत पोहचवू शकलो असल्याचे त्यांनी सांगितले.तर येणाऱ्या काळात भाजप कडून तेथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असून पर्यटक कसे येतील.यावर आमचे प्रमुख लक्ष असणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.