फाईल चोरी प्रकरणात काँग्रेसच्या नगरसेविके विरुद्ध गुन्हा दाखल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयातील फाईल घेऊन जाऊन काँग्रेसच्या नगरसेविका सुरेखा कांबळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फाईल चोरी प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आयुक्त कार्यालयताल संगणक चालक शैलेश कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

विकासकामांच्या फयली मार्गी लावाव्यात यासाठी कांबळे यांनी मागील आठवड्यात महापालिका मुख्यालयात आदोलन केले होते. तसेच महासभेत त्यांनी डोक्यात दगड घालून स्वत: ला जखमी करुन घेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणानंतर त्या प्रशासनाच्या रडारवर आल्या होत्या. कांबळे यांच्या प्रभागातील अनेक विकासकामे आयुक्त कार्य़ालयाकडून अडवली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.

कांबळे यांच्या प्रभागातील ५० लाख रुपयांच्या कामाची फाईल आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याकडे होती. कांबळे यांनी ती फाईल पळवली आणि शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार शैलेश कांबळे यांनी पोलिसांकडे केली आहे.

याबाबत सुरेखा कांबळे म्हणाल्या, आतापर्यंत माझ्या भागातील विकासाची कोणतीच कामे झालेली नाहीत. कामाबाबच चर्चा करण्यासाठी मी आयुक्त खेबूडकर यांच्याकडे असलेली फाईल घेऊन महपौर हारुण शिकलगार यांच्याकडे आले होते. त्यानंतर परत ही फाईल मी ठेवलेली आहे. यामध्ये मी  शासकीय कामात कोणताही अडथळा केला असे वाटत नाही. शिवाय फाईल चोरीचा प्रश्नच येत नाही, असेही त्या म्हणाल्या.