बीएमसीसी रोडवरील वाहतूक सोडता शहरातील वाहतूक व्यवस्थेत कोणतेही बदल नाहीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शहरात विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे होत आहेत यासाठी अनेक प्रतिष्ठीत मान्यवर सध्या शहरात उपस्थित आहेत. जागतिक मराठी अकादमी तर्फे होणाऱ्या बीएमसीसी मैदानावरील कार्यक्रमामुळे केवळ याच मार्गावरील वाहतूक संथ गतिने राहणार आहे. या व्यतिरीक्त वाहतूक व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नसून इतर कोणते मार्ग बंद केलेले नाहीत . तसेच आज पासून बारावीच्या परिक्षा सुरू होत असल्यामुळे विद्यार्थीना लवकरात लवकर परिक्षा केंद्रावर पोहचता यावे यासाठी उत्तम वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पं यांचा मुलगा आज पुण्यात असून त्यांच्या वाहतूकीचा बंदोबस्त पूर्ण वेगळा ठेवण्यात आला आहे . शहरातील वाहतूक व्यवस्था आणि ट्रम्पच्या मुलाचा पुणे दौरा यामुळे कोणतेही वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात करण्यात आलेले नाहीत. अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उप- आयुक्त अशोक मोराळे यांनी पोलीसनामाशी बोलताना दिली आहे.
त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही सोशल मिडीयावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आव्हान ही वाहतुक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.