बुधवार पेठेतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करुन, दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. याप्रकरणी कुंटनखान्याची मालकीन पद्मा ऊर्फ कमला कल्पेश जैन (वय-35, रा. घर नं1008, बुधवार पेठ पुणे. मुळ गाव नेपाळ), दिनेश मोहन यादव (वय-36 रा. गोपीनाथनगर वार्ड नं 2, श्रीरामपुर, जि. अहमदनगर, सध्या बुधवार पेठ) या दोन आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम व बाल लैंगिक आत्याचार संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपासासाठी फरासखाना पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना फ्रिडम फर्म या स्वयंसेवी संस्थेने 17 वर्ष वय असलेली एक अल्पवयीन मुलगी मिरज येथील भगिनी निवेदीता संरक्षणगृह मिरज या ठिकाणावरुन पळून गेली असून, सदर मुलीला दिनेश यादव याने पळवून आणून बुधवार पेठेत जबरदस्तीने वेश्याव्यावसाय करुन घेत असल्याची माहिती  दिली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर छापा मारला असता त्या मुलीसह आणखी एक अल्पवयीन मुलीला ताब्यात घेवून हडपसर येथील सुधारणागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सदरची कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, गुन्हे-2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल भालेकर, नितीन तरटे, रमेश लोहकरे, नामदेव शेलार,राजाराम घोगरे,ननिता येळे,कविता नलावडे,सचिन कदम, राजेश उंबरे,नितीन लोंढे, संदीप गायकवाड,रेवनसिद्ध नरोटे, सुनिल नाईक, सचिन शिंदे, अनुराधा ठोंबरे, रुपाली चांदगुडे, तसेच फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हण व त्यांच्या सहकार्यांनी केली.