भूतलेणी पाहण्यासाठी आलेल्या परदेशी पर्य़टकांवर मधमाशांचा हल्ला

जुन्नर पोलिसनामा ऑनलाईन

जुन्नर तालुक्यातील भिमाशंकर डोंगराजवळ असलेल्या भूतलेणी पाहण्यासाठी आलेल्या दक्षिण कोरीयातील सात पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. हा प्रकार भूतलेणी पहत असताना दुपारी चारच्या सुमारास घडला. अचानक झालेल्या या हल्लामुळे पर्यटक घाबरुन गेले.

आज दुपारी दक्षिण कोयरीयातील सात पर्यटक भिमाशंकर परिसरात पर्यटनासाठी आले होते. भिमाशंकरच्या डोंगरामध्ये अंबा-अंबिका या लेण्यांच्या जवळ असलेल्या भूतलेणी पहाण्यासाठी हे पर्यटक गेले होते. त्यावेळी अचानक मधमाशांनी हल्ला करुन काही पर्यटकांचा चावा घेतला. या हल्ल्यामध्ये पर्यटक किरकोळ जखमी झाले. या प्रकारानंतर पर्यटकांनी काढता पाय घेत नाशिकला निघून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.