माउलींच्या समाधीवर चंदनाच्या उटीतून साकारला विठ्ठल

माउलींच्या समाधीवर चंदनाच्या उटीतून साकारला विठ्ठल

आळंदी : पोलीसनामा ऑनलाईन
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आळंदी मधील संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीवर चंदनाच्या उटीमधून विठ्ठलाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ‘स्वकाम सेवे’च्या स्वयंसेवकांनी ही प्रतिकृती साकारली आहे.

आज साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी माउलींच्या समाधीवर चंदनाची उटी लावण्यात आली आहे. त्यावर वारकरी संप्रदायाचे दैवत असलेल्या विठ्ठलाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. समाधीवर विठ्ठलाची प्रतिकृती अतिशय सुंदर आणि हुबेहूब साकारण्याचे काम स्वकाम सेवा मंडळाने केले आहे. आज मोठ्या प्रमाणात भाविक आळंदी येथे येऊन दर्शन घेत असतात, त्यातच आज त्यांना आळंदीतल्या माउलींच्या समाधीमध्येच विठ्ठलाचे दर्शन झाल्याने भाविकांमध्ये समाधान आणि आनंद दिसत होता.

माउलींच्या समाधीवर चंदनाच्या उटीतून साकारला विठ्ठल