माजी मंत्री बबनराव घोलपांची दीड लाखांची फसवणूक

नाशिक :पोलीसनामा ऑनलाईन

नाशिक : वेगवेगळे आमिष दाखवून फसविल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. यात सामान्य नागरिक जास्त बळी पडताना पाहायला मिळतात. परंतु नाशिकमध्ये माजी मंत्र्यालाही दीड लाखाचा गंडा घातला आहे.

माजी मंत्री आणि शिवसेना नेते आमदार बबनराव घोलप यांच्यासोबतही असेच काहीसे घडलेय. बबनराव घोलप यांची दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आयफोन आणि व्हीआयपी नंबर देण्याच्या आमिषापोटी फसविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते.