येडेश्वरी यात्रे निमित्त शासकीय नियोजन समितीची बैठक संपन्न

येरमाळाः पोलिसनामा ऑनलाईन
संदीप बारकुल

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानीची धाकटी बहिण म्हणून येडेश्वरी देवीला अोळखले जाते. नवसाला पावणारी देवी म्हणून राज्यभर देवीची ख्याती आहे. चैत्र पोर्णिमेला देवीची येरमाळा गावात मोठी यात्रा भरते. परराज्यसह लाखों भाविक यात्रेला हजेरी लावतात. त्यामुळे प्रशासनावर यात्रा नियोजनाची सर्वात मोठी जबाबदारी असते.

देवीच्या यात्रा नियोजनाची प्रशासकीय बैठक ठरल्याप्रमाणे औपचारिक चर्चेवर पार पडली. मागील पाच वर्षापासून मुख्य मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे भाविकांकडून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत असताना केवळ या विषयावर चर्चा करण्यात आली.

येडेश्वरी देवीचीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला ३१ मार्च शनिवार पासून सुरूवात होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची यात्रा नियोजन बैठक पार पडली. प्रतेक वर्षी प्रमाणेच जि.प प्रशासन, महसूल, पोलिस प्रशासन, राज्य परिवहन मंडळ ,यांनी तयार केलेल्या यात्रा नियोजनाचा आढावा सादर केला. यात्रेकरुंच्या प्रवासाची सोय करण्यासाठी परिवहन मंडळाने चारशे पन्नास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. महावितरण कंपनीने चोवीस तास विद्युत पुरवठा व तांत्रिक दुरुस्त्या करण्याची व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागाने आरोग्य बुथ व पाणी शुद्धीकरणाच्या संदर्भात नियोजन केले असून यात्रेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी उस्मानाबाद जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने चारशे पन्नास पोलीस कॉन्स्टेबल, दोनशे पन्नास होमगार्ड, चाळीस कमांडो असा तगडा बंदोबस्त असणार आहे. एकंदर या संपूर्ण विषयावर चर्चा पार पडली.

सध्या यात्रा मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे नव्याने काम झाल्यामुळे रस्त्यांची उंची वाढली आहे . यात्रेसाठी येणारी भाविकांची वाहने अमराई व चुन्याच्या रानात उतरता यावीत उतरण्यासाठी आयआरबी कंपनीसोबत बैठकीचे आयोजन करुन रॅम्प तयार करावा त्यामुळे यात्रा काळात एकेरी वाहतुकीमुळे वाहतुककोंडी होणार .जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मात्र या नियोजन बैठकीला दांडी मारली होती . मुख्य मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा विषय चांगलाच गाजल्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा अधिकारी किंवा प्रतिनिधी हजर नव्हता. 

येडेश्वरी यात्रा महोत्सवाची शासकीय नियोजन बैठक बुधवारी येडेश्वरी मंदिर येरमाळा या ठिकाणी उपविभागीय अधिकारी चारुशीला देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्ना झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, तहसीलदार नंदलगावकर ,येरमाळा गावचे सरपंच विकास बारकुल, ग्रामस्थ व पुजारी उपस्थित होते .