‘येथे’ गुढीपाडव्याला गुढी ऐवजी उभारणार ‘भगव्या’ पताका

अमरावती: पोलीसनामा ऑनलाईन
मराठी नववर्षाची सुरवात म्हणजे चैत्र शुक्ल पक्षातील प्रतिपदा. याच दिवशी लोक आपल्या घरासमोर सडासंमार्जन करून गुढी उभारतात. मात्र अमरावती शहरात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घरांवर गुढी ऐवजी भगव्या पताका उभारणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. शहराबरोबरच जिल्ह्यातील सहा तालुके आणि गावे देखील भगवेमय करण्याचा संकल्प लोकांनी केला आहे.

अमरावती शहरात आणि जिल्ह्यात गावोगावी बैठका घेऊन गुढी ऐवजी भगवी पताका उभारण्याचा संकल्प केला आहे. मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच अनेक ठिकाणी भगव्या पताका उभारल्या असून उद्या अनेक ठिकाणी भगव्या पताका उभारणार असल्याचे बोलले जात आहे. संभाजी ब्रिगेडकडून जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये भगव्या पताका उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.