लोकल ट्रेनमध्ये पत्रकाराला जबर मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

एका वरिष्ठ पत्रकाराला ट्रेनमध्ये मारहाण करण्याची घटना मुंबईत  मीरा रोड येथे घडली आहे.  ‘इंडिया टीव्ही’ या वृत्तवाहिनीचे हे पत्रकार असून सुधीर शुक्ला असे या पत्रकाराचं नाव आहे.

सुधीर शुक्ला यांच्यावर १५ ते २० गुंडांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात यासंदर्भातला गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू आहे.