विकृतीचा कळस ; स्तनपान करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ काढणारा अल्पवयीन ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुलाला दुध पाजताना महिलेचा व्हिडीओ करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घोरपडी येथील ही घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिला ही पती व मुलासह एका लहाना खोलीमध्ये राहते.घर पत्र्याचे आहे. त्यामुळे त्या पत्र्यांवर छिद्र आहेत. रात्री मुलाला भूक लागल्याने तो रडत होता. त्यावेळी फिर्यादी महिला आपल्या मुलाला दुध पाजत होती. त्यावेळी तिच्या पतीलाही जाग आली. त्यावेळी कुणीतरी पत्र्यांवरून आत डोकावत अलल्याची जाणीव तिच्या पतीला झाली. त्यानंतर तिच्या पतीने आरडाओऱडा करण्यास सुरुवात केली.आणि छतावर लपलेल्या मुलाला पकडले. त्यानंतर त्याच्या हातातील मोबाईल घेऊन पाहिल्यावर त्या महिलेचा मुलाला दुध पाजतानाचा व्हिडीओ होता. ते पाहात असतानाच त्याने मोबाईल हिसकावून पळ काढला. त्यानंतर महिलेने पतीसोबत जाऊन त्याच्याविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.