विजय मल्यावर आधारित ‘रंगीला राजा’

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन

विजय मल्यावर आधारित ‘रंगीला राजा’हा नविन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता गोविंदा विजय मल्याची भूमिका साकारणार आहे. सेन्साॅर बोर्डाचे अध्यक्ष, निर्माते पहलाज निहलानी हे गोविंदासोबत विजय मल्यावर आधारित चित्रपट करणार आहेत.

पहलाज निहलानी यांनी चित्रपटाबद्दल अधिक माहिती दिली नाही, मात्र प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, मल्यासारखेच कपडे आणि मल्यासारखा स्वभाव, या गोष्टिंकडे लक्ष दिले जाणार आहे. गोविंदाविषयी सांगताना म्हणाले की, सर्वांत मोठा घोटाळा करणाऱ्या एका व्यक्तिची भुमीका गोविंदा करत आहे.

हा चित्रपट आॅगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्‍या आठवड्‍यातच निहलानी यांनी गोविंदासोबत एका गाण्‍याचे शूटिंगदेखील पूर्ण केले. ‘रंगीला राजा’मध्‍ये गोविंदा आणि निहलानी तब्‍बल ३५ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत.

विजय मल्‍ल्‍याने विविध बँकांचे ९ हजार कोटी रुपये बुडवून तो परदेशात पळून गेला आहे. त्‍याच्‍याविरोधात ईडीने समन्‍स पाठवूनही मल्‍ल्‍या भारतात परतला नाही.