शमीच्या हसीनची ‘हसीन’ दास्तां

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाने गंभीर आरोप केले. तेव्हापासून दोघेही चर्चेत आहेत. एकीकडे मोहम्मद शमीने कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा विश्वास एका वृत्तवाहिनेवर व्यक्त केला, तर दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाविषयी नवीन माहिती समोर आली आहे.

शमीची पत्नी हसीन जहा विषयी अत्यंत कमी लोकांना हे माहित असेल की शमीसोबतचं हसीनचं दुसरं लग्न आहे. जग जिला आज शमीची पत्नी म्हणून ओळखतं त्या हसीनने यापूर्वी प्रेमविवाह केला होता. हसीनने शेख सैफुद्दीन नावाच्या तरुणाशी पहिलं लग्न केलं होतं. हसीन दहावीत असताना दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि २००२ साली ते विवाहबंधनात अडकले. मात्र हसीनच्या नशिबात वेगळंच लिहिलेलं होतं.

लग्नाच्या आठ वर्षांनंतर म्हणजे २०१० साली दोघांचा घटस्फोट झाला. हसीनचा पहिला पती सैफुद्दीनचं कोलकात्यात किराणा दुकान आहे. हसीन आणि सैफुद्दीन यांना दोन मुलीही आहेत. एक मुलगी दहावीत, तर दुसरी सहावीत शिकते. दोन्हीही मुली कोलकात्यात सैफुद्दीनसोबत राहतात.