शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे उपमहापौर छिंदमला अटक

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन

शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन वादाच्या भौ-यात आडकलेले अहमदनगर महानगरपालिकेचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अटक करण्यात आली आहे. छिंदम याला सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरातून आज (शुक्रवार) रात्री पावणे नऊच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

शिव जयंतीवरुन अक्षेपार्ह वक्तव्य करणा-या नगरच्या भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या वक्तव्याची क्लिप व्हयरल झाल्याने शिवप्रेमींमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे. अक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल उपमाहपौर श्रीपाद छिंदम याची भाजप आणि उपमहापौर पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. अपशब्द वापरल्याचा ऑडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे संतप्त जमावाकडून श्रीपाद छिंदम यांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली होती.
छिंदम याला अटक करण्यासाठी सर्वच स्तरातून पोलिसांवर दबाव होता. घटनेनंतर तो पळून गेला होता. त्याच्या शोधार्थ पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी चार पथकडे अटकेसाठी तयार करुन रवाना केली होती. छिंदम हा सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.