श्रमदानात सहभागी झाल्यास, महाराष्ट्र दुष्काळ आणि टँकर मुक्त होईल : आमीर खान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
”राज्यातील विविध जिल्ह्यात मागील तीन वर्षांत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रमदान होत आहे. यामुळे पाणी समस्या सोडवण्यास मोठा हातभार लागला आहे. या श्रमदानात प्रत्येक नागरिकाने सहभाग घेतल्यास महाराष्ट्र लवकरच दुष्काळ आणि टँकर मुक्त होईल.,” असा विश्वास पाणी बॉलिवूडमधील मी.परफेक्शनिस्ट अमीर खानने पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

‘पाणी’ फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील 24 जिल्ह्यात यंदा श्रमदान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पाणी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ, नवीन नियुक्त झालेले पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सिम्बॉयसिसचे संस्थापक शां.ब.मुजुमदार,अभिनेते गिरीश कुलकर्णी उपस्थित होते.

पाणी फाऊंडेशन विषयी बोलताना आमीर खान म्हणाला,”ज्या वेळी पाणी फाऊंडेशनने सुरुवातीच्या काळात श्रमदान करण्याचे काम केले .तेव्हा गावाची परिस्थिती अत्यंत भीषण होती. बऱ्याच गावांत शेतीसाठी पाणी नव्हते. मात्र आता ज्या गावामध्ये पाणलोटचे काम पूर्ण झाले आहे त्या गावात पाणी प्रश्न पूर्णपणे सुटला आहे. पुणे जिल्ह्यात येत्या 1 मे रोजी 24 जिल्ह्यात श्रमदानाचे काम सुरू होणार असून त्यावेळी मी एका गावामध्ये सहभागी होणार आहे.
‘पाणी’ फाऊंडेशनच्या माध्यमातून अशाच प्रकारे पुढील पाच वर्ष काम अखंड राहिल्यास ‘पाणी’ फाऊंडेशनला काम करण्याची गरज राहणार नसून या कामात शहरातील तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

संबंधित घडामोडी:
मी शाहरुखचा स्वदेस चित्रपट पहिला नाही : अमीर खान

श्रमदानात सहभागी झाल्यास, महाराष्ट्र दुष्काळ आणि टँकर मुक्त होईल : आमीर खान