संजीवकुमार सिंघल अन् पुणे आयुक्तालयासाठी हा तर दुर्मिळ योगायोग

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन

पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, सह आयुक्त आणि काही दिवसांसाठी प्रभारी आयुक्त म्हणून कार्यरत राहण्याचा दुर्मिळ असा हा योगायोग घडून आला. अप्पर पोलीस माहसंचालक संजीवकुमार सिंघल यांच्यासाठी. पुणे पोलीसांच्या इतिहासात आत्तापर्यंत या चारही पदावर काम करण्याचा मान कोणालाही मिळाला नाही. मात्र, तो बहूमान योगायोगाने संजीवकुमार सिंघल यांना मिळाला.

कडक शिस्त आणि कायद्याला धरुन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना एकाच आस्थापनेवर अनेक वर्ष काम करणे अतिशय कठीण असते. मात्र, एखादा अधिकारी ते शक्य करुन दाखवितो. संजीवकुमार सिंघल यांनी पुणे शहर पोलीस दलात सन 1999 ते 2000 या दरम्यान परिमंडळ २ मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम केले. दोन-तीन आठवडेच त्यांच्याकडे पदभार होता. या अल्प काळात त्यांनी या झोन मध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यानंतर त्यांची डी. सोलापूर ग्रामीण येथे पोलीस अधिक्षक पदी बदली झाली. त्यानंतर इतर ठिकाणी त्यांनी कर्तव्य बजावले. अाैरंंगाबाद येथे पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत असतानाच त्यांची पदोन्नती झाली. त्यांची बदली डीआयजी म्हणून पुण्यात वायरलेस विभागात झाली. त्यानंतर त्यांची बदली पुणे पोलिस दलात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून झाली. प्रशासनाची (अॅडमीन) जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. या काळात त्यांनी आपल्या काैशल्याने पोलीसांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. पोलीस कल्याण निधीचा वापर चांगल्या कामात व्हावा, याकडे लक्ष दिले. पोलीस शिस्त अंगी असली तरी त्याला एक मानवी चेहरा देण्याचे काम त्यांनी प्रशासन सांभाळताना केले. त्यांच्याकडे प्रशासन विभागाचा कार्यभार दि. 13 फेब्रुवारी 2009 ते 18 जुलै 2011 पर्यंत होता. त्यानंतर त्यांची पदोन्नती झाली. ते विशेष पोलीस महानिरिक्षक झाले. त्यांची पुण्यात सह पोलीस आयुक्त म्हणून18 जुलै 2011रोजी नेमनूक झाली. सलग सुमारे अडीच वर्षे त्यांनी ते काम उत्तम रित्या सांभाळले. या काळात त्यांनी शहरातील अनेक गुंडांवर कारवाई करण्यासाठी, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाणे, झोन मधील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून प्रस्ताव तयार करवून घेतले. त्याचा पाठपुरावा घेऊन गुंड टोळ्यांना कारागृहात पाठविण्याचे काम केले. या कारवाई मुळे पुण्यातील गुंडगिरीवर वचक बसला. त्यानंतर त्यांची दुसरीकडे बदली झाली. मार्च 2017 मध्ये त्यांची अप्पर पोलीस महासंचालक म्हणून बढती झाली. त्यांची राज्य गुन्हे अन्वेशन (सीआयडी) विभागात नियुक्ती झाली. पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला या 15 फेब्रुवारी ते 4 मार्च या काळात रजेवर होत्या. त्यांच्या रजेच्या काळात सिंघल यांच्याकडे प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार सोपविण्यात आला होता.
खर तर प्रभारी पद हे केवळ तात्पुरते असते. अनेक अधिकारी कार्यालयीन गरज म्हणून त्याकडे पाहतात. पण सिंघल यांनी या दिवसातही आपले संपूर्ण लक्ष पुणे शहरावर केंद्रीत केले होते. याच काळात नागझरी येथे तिहेरी खुनाचा प्रकार घडला. स्वतः सिंघल यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. याच काळात रविवार पेठेत सराफ दुकानावर दरोडा पडला होता. त्याचा तपास पोलीसांनी 12 तासात केला. या सर्व घटनांचे नियमित अपडेट ते घेत होते.

पुणे पोलीस आयुक्तालयात 4 वरिष्ठ पदावर काम करण्याची दुर्मिळ संधी संजीवकुमार सिंघल यांना मिळाली. आत्तापर्यंत पुणे पोलीस अायुक्तालयात विविध पदावर काम करणारे अधिकारी हे राज्य पोलीस दलाच्या महासंचालक पदापर्यत पोहोचले. तर, काही अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून काम केले. मात्र त्यापैकी कोणीही पुणे पोलीस आयुक्तालयातील 4 वरिष्ठ पदे भुषवू शकले नाहीत. पुणे पोलीस आयुक्तालयासाठीच नव्हे तर संजीवकुमार सिंघल यांच्यासाठी देखील हा योगायोग एक माईलस्टोन बनणार आहे.