सदाशिव पेठ ते पर्वतीला जोडणारा निलायम पुल उद्यापासून पंधरा दिवस वाहतूकीसाठी बंद

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

पुणे महानगर पालिकेकडून टाकण्यात येणाऱ्या २२०० मी.मी व्यासाच्या जलवाहिनीच्या कामासाठी सदाशिव पेठ ते पर्वतीला जोडणारा निलायम पुल उद्यापासून (६ मार्च) पुढील सलग पंधरा दिवस वाहतूकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या कामाच्या कालावधीमध्ये वाहतूक कोंडी होवू नये यासाठी वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतूक शाखेला सहकार्य करावे असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वाहतूकीसाठी वापर करावा

1) जनता वसाहत व गजानन महाराज चाैकाकडून निलायम ब्रिज मार्गे ना. सी फडके चाैकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी गजानन महाराज- शिवदर्शन चाैक -मित्रमंडळ चाैक- सावरकर चाैक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
2)ना.सी. फडके चाैकाकडून निलायम ब्रिजकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी
ना.सी फडके चाैकातून सरळ पर्वती अोव्हर ब्रिज खालून डाविकडे सावरकर चाैक- मित्रमंडळ सर्कल- वर्धमान चाैक- गजानन महाराज चाैक या मार्गाचा वापर करावा किंवा ना.सी फडके चाैकातून सरळ पर्वती अोव्हर ब्रिज खालून सावरकर चाैक – मित्रमंडळ मार्गे-शिवदर्शन चाैक-गजानन महाराज चाैक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.