सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय इच्छा मरणाला सशर्त परवानगी

नवी दिल्ली : इच्छा मरणाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने इच्छा मरणाला सशर्त परवानगी दिली आहे.
सन्मानाने जगणं जसा मूलभूत अधिकार आहे, तसाच अधिकार मृत्यूबाबतही आहे, असे या न्यायालयाने नमूद केले.

शेवटचा श्वास कधी घ्यावा, हे ठरविण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे. त्याला सन्मानाने मरण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सांगत न्यायालयाने इच्छा मरणाला परवानगी दिली आहे. केवळ श्वास चालू आहे. म्हणून एखाद्या मरणासन्न व्यक्तीला जिवंत ठेवणे योग्य ठरणार नसल्याचंही न्यायालयाने या निकालात नमूद केलं. त्यामुळे मरणासन्न व्यक्तीने इच्छा मृत्यूपत्र तयार केले असेल तर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवता येणार नाही. दरम्यान, या निर्णयाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून इच्छा मरणाबाबतचे निकष ठरविण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.के सिकरी, न्यायमूर्ती ए.एम खानविलकर,न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.