सर्वोच्च न्यायालयाबाबतचे ते वृत्त खोटे

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांच्या पिकांमधुन सर्वोच्च न्यायालयाची देखील सुटका झाली नाही. संकेतस्थळाचे तांत्रिक काम सुरू असताना सोशल ते हॅक झाल्याचे वृत्त पसरत आहे.
न्यायाधीश लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही वेळातच सर्वोच्च न्यायालयाची संकेतस्थळ ठप्प झाले. तांत्रिक कारणामुळे हे संकेतस्थळ डाऊन झाली असली तरी सोशल मीडियावर मात्र हे संकेतस्थळ हॅक झाल्याची अफवा पसरली आहे. ही वेबसाइट हॅक करण्यामागे ब्राझिलच्या हॅकर ग्रुपचा हात असल्याचा दावाही सोशल मीडियावरून करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाचे संकेतस्थळ उघडल्यावर ‘This site can’t be reached’ असा मेसेज येत असल्याने हॅक झाल्याची अफवा पसरवली आहे. या साइटवर ‘साइट अंडर मेंटेनन्स’ असे मेसेजही दिसत आहेत. हे संकेतस्थळ डाऊन असल्याचे समजते.

संबंधित घडामोडी:

सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक