सांगली महापालिकेत पोस्टरबाजी वरुन राडा

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन

सांगली महापालिकेत दलित संघटनेकडून दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली आहे. या दगडफेकीचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे डिजिटल फ्लेक्स उतरवले असावे. यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले असून कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयाची मोडतोड केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी अतिक्रमण अधिकाऱ्यालाही मारहाण केली आहे.