सावरकरांच्या पुतळ्यावर फेकला काळा रंग

औरंगाबाद : पोलीसनामा अॉनलाईन
येथील समर्थनगर भागात पोलिसनियंत्रण कक्षाच्या बाजूला असलेल्या सावरकर पुतळ्यावर शुक्रवारी अर्धरात्री समाजकंटकांनी काळा रंग फेकल्याचा प्रकार घडला आहे. शनिवारी सकाळी लोकांनी पाहील्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यामुळे याठीकाणी लोकांची गर्दी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस व महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून पुतळ्याची साफसफाई सुरू आहे. या घटनेचा सावरकरप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या घटनेला जबाबदार समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी विविध संघटना तसेच सावरकर प्रेमींकडून करण्यात येत आहे.