सुपरवायझरच्या त्रासाला कंटाळून सतरा वर्षीय मुलीची आत्महत्या

पुणे – सुपरवायझरने जवळीक करण्याचा प्रयत्न करत दिलेल्या त्रासाला कंटाळून सतरा वर्षीय मुलीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास विमाननगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी सुपरवायझरला अटक केली आहे.

‎सोनू सिद्धू राठोड (17,इंदिरा नगर लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. जितेंद्र नागनाथ गायकवाड (25,मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 18 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.

विमाननगर येथे असलेल्या रोहन मिथीला सोसायटीमध्ये हाऊस कीपींगचे काम करत होती. तिथे जितेंद्र गायकवाड हा सुपर वायझर म्हणुन काम करतो. दरम्यान त्याने सोनू हिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि तिने त्याला विरोध केल्यानंतर जितेंद्र ने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून तिने. सोसायटी च्या यू इमारतीच्या पाचव्या मजल्या वरुन उडी मारून आत्महत्या केली. पुढील तपास विमानतळ पोलिस करत आहेत.