थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव करून पैसे घ्या : शरद पवार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

‘बँकेने तूम्हाला साथ दिली पाहिजे आणि तुम्ही बँकेला दिली पाहिजे . मी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदारांची यादी बघितली. जो मोठा माणूस त्यानेच फसवलेय माझं स्वच्छ सांगणे आहे, त्यात अनेक मोठ्यांचा समावेश आहे. तो किती मोठा आहे, कुठे बसतो हे पाहत बसू नका. थेट नोटीस काढा आणि मालमत्तेचा लिलाव करून टाका आणि गरिबांचा पैसे देऊन टाका असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे बोलताना दिला.

या बँकेत पतपेढीचेही खाते आहे ,सोसायटीचे खाते आहेत ,गरिबांचेही खाते आहेत , माझ्या नावाने असलेल्या बचत गटाचाही पैसे बँकेत आहेत त्यामुळे बँक नीट चालवा . कुणाचाही पैसा बुडेल असा व्यवहार करू नका , नाहीतर तुमच्या सोबत माझेही नाव यात घेतले जाईल असे काही करू नका अशी मिश्किल टिप्पण्णी त्यांनी यावेळी केली. कुणीही कितीही मोठा असो त्याचेकडून पैसे वसूल करा आणि गरिबांचे पैसे देऊन टाका असा सल्‍ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्रीशरद पवार यांनी दिला. ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.