सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्या पत्नीची पतीनेच केली हत्या

गुरुग्रामः वृत्तसंस्था

सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्या पत्नीची पतीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुग्राममध्ये घडली आहे. लक्ष्मी(वय-32) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी हरी अोम (वय-35) या तरुणाला अटक केली असून त्याची रवानगी न्यायलीयन कोठडीत करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, गुरुग्राममध्ये वास्तव्य करणाऱ्या हरी ओम या तरुणाचा २००६ मध्ये लक्ष्मी (वय ३२) या तरुणीशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले असून, गुरुवारी रात्री हरीओमचा पत्नीशी किरकोळ कारणावरुन वाद झाला आणि रागाच्या भरात हरी अोम याने पत्नीची हत्या केली. शुक्रवारी सकाळी लक्ष्मीचे वडील बलवंत सिंग त्यांच्या घरी आले असता त्यांना बेडवर मुलीच्या मृतदेहाशेजारी हरीओम बसलेला दिसला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

2006 मध्ये लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सर्व काही आमचं व्यवस्थीत सुरु होते. मात्र दोन वर्षापुर्वी मी पत्नीला स्मार्ट फोन घेवून दिला. एका फोनचा एवढा विपरीत परिणाम झाला की, त्या फोनने ती एवढी बदलली की तिने माझ्याकडे व मुलांकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली. ती दिवसरात्र फेसबुक आणि व्हाॅट्सअॅपवरच असायची असे लक्ष्मीच्या पतीने पोलिसांना सांगितले. एवढच नाही तर तिने घरात स्वयपांक देखील करणे बंद केले.

सुरुवातीच्या कालावधीत मला वाटले एक दिवस ती स्मार्ट फोनला कंटाळेल मात्र ती ज्यास्तच आहारी गेली. मुलांचे हाल होवू नयेत म्हणून मी मुलांना कुरुक्षेत्रमधील बोर्डिंगमध्ये टाकले. पत्नीचा वाढता सोशल मिडियाचा वापर पाहता मला तिचे अनैतिक संबंध असावेत असा संशय येवू लागला. यावरुनच आमच्या दोघांत गुरूवारी रात्री वाद झाला. यावेळी मी पत्नीची हत्या केल्याची माहिती हरी अोमने दिली आहे. लक्ष्मीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हरी अोमच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.