स्वयंपाक न केल्याच्या कारणावरुन पत्नीचा खून

मावळ : पोलीसनामा ऑनलाईन

स्वयंपाक बनवला नसल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हा प्रकार काल रात्री दहाच्या सुमारास नवलाख उंब्रे येथील भगवान संतु दरेकर यांच्या विटभट्टीवर घडला.

शारदा अशोक चौरे (वय-40) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी अशोक विठ्ठल चौरे (वय45) याला अटक करण्यात आली आहे. तर देवेश शंकर वाघमारे (वय-17) याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरपी अशोक याला दारु पिण्याचे व्यसन आहे. काल रात्री मयत शारदा यांनी स्वयंपाक केला नाही. याचा राग आल्याने अशोकने लाकडी दांडक्यांना त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अशोकला अटक केली आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.