ह्युंदाई कारचा ‘फ्री कार केअर क्लिनिक’ सप्ताह

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
ह्युंदाईच्या ग्राहकांसाठी 27 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान कंपनीच्या वतीने ‘फ्री कार केअर क्लिनिक’ (चेकअप) सप्ताहामध्ये कारची मोफत तपासणी करुन दिली जाणार आहे. कुंदनच्या चिंचवड थरमॅक्स चौक, चाकण, पिंपळे सौदागर आणि बावधन शोरूममध्ये मंगळवारी उदघाटन करण्यात आले असून या ठिकाणी सेवा मिळणार आहे.
देशातील अग्रगण असणाऱ्या आणि ऑटोमोबाइल क्षेत्रात दुसऱ्या स्थानावर असलेल्या ह्युंदाई मोटर इंडिया लि.चे देशभरात 26 व्या ‘फ्री कार केअर क्लिनिक’ची घोषणा केली आहे. ग्राहकांना याचा चांगला फायदा होणार आहे.
हा ग्राहक जोडणी हा उपक्रम 27 मार्च ते 5 एप्रिल 2018 दरम्यान देशभरातील सर्व सव्हिस सेंटरवर (सेवा आउटलेट) आयोजित केला आहे. 26 व्या FCCC चे उद्घाटन चिंचवड़ थरमॅक्स चौकातील कुंदन कार प्रायव्हेट लिमिटेड या शोरूम मध्ये निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पळसुळे व कुंदन ह्युंदाईचे संचालक हितेश चड्डा, राजकुमार चड्डा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मोफत कार केअर क्लिनिकमध्ये इंजिन, ट्रान्समिशन, इलेक्ट्रिकल सिस्टिम, अंडर-बॉडी, एसीचे चेकिंग केले जाणार आहे. यासोबत ग्राहकाना स्पेयर पार्ट्स, लेबर चार्ज आणि अन्य सेवांवर आकर्षक सवलत दिली जाणार आहे.
तसेच वॉरंटी आणि रोड साइड असिस्टंट प्रोग्रॅमसाठीही आकर्षक सवलत देऊ केली आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त दिवसांची वाहने असलेल्या ग्राहकांना खास सवलत आहे.
हितेश चड्डा म्हणाले, उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे वाहनांची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. आम्ही कुंदनच्या चिंचवड, पिंपळे सौदागर, चाकण आणि बावधन शोरूममध्ये ग्राहकांना आकर्षक सवलत देत आहे, त्याचा फायदा सर्वानी घ्यावा.
पळसुळे म्हणाले, ह्युंदाई कंपनीच्या कार चांगल्या आहेत. आपल्याकडील कारची वेळेवर देखभाल केल्यास तिचे आयुष्य वाढते. सध्या सुरु असलेल्या ह्युंदाई ‘फ्री कार केअर क्लिनिक’चा फायदा करुन घ्यावा.