पिकअप उलटून भीषण अपघात; 11 जण ठार, 7 जखमी

पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव पिकउप वाहन उलटून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. तर 7 जण जखमी झाले आहेत. ओडिशातील कोरापुट जिल्ह्यात मुर्ताहांडीजवळ रविवारी (दि. 31) रात्री हा भीषण अपघात झाला आहे. जखमींना उपचारासाठी जगदलपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

 

 

 

 

 

ओडिशातील सिंधीगुडा गावातील प्रवासी पिकअप वाहनातून छत्तीसगडच्या कुलता या गावी निघाले होते. त्यावेळी रात्रीच्या अंधारात ही भीषण दुर्घटना घडली. कोरापुटच्या जिल्हाधिकारी मधुसूदन मिश्रा यांनी अपघाताची माहिती घेत सर्वोतोपरी मदतीचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना जगदलपूर रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेची दखल घेत ट्विट करुन मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत, त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले आहे. जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे होतील, अशी आशा बाळगतो, असेही मोदींनी म्हटले.