पुणे-मुंबई ‘हायपरलूप’ प्रकल्प हा ‘पायाभूत सुविधा’ प्रकल्प म्हणून घोषित ! मंत्रिमंडळाने आज घेतले ‘हे’ १२ मोठे निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज १२ मोठे निर्णय घेण्यात आले. घेण्यात आलेल्या निर्णयांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे.

मंत्रिमंडळातील १२ महत्वाचे निर्णय

१. आदिवाशी विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना विशेष कार्यक्रमांतर्गत धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय.

२. बहुजन, दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना.

३. महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीमार्फत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता.

४. पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यास पाणी वळविण्यासाठी नदीजोड योजनेला राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्यास मान्यता देण्यात आली असून सर्वेक्षण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

५. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यास मान्यता.

६. सुपर ३० हिंदी चित्रपटास जीएसटी कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा करातून परतावा देण्याचा निर्णय.

७. नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या कामगारांना सानुग्रह अनुदानासाठी १० कोटी

८. पर्य़टन विकास व देखभालीसाठी एमटीडीसीला देण्यात आलेल्या अंबाझरी येथील ४४ एकर शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याची मुदत ९९ वर्षे करण्यास मान्यता

९. राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या परिक्षेत्राचे धोरण मंजूर.

१०. इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (IDTR) संस्थेच्या स्थापनेसाठी नागपूर जिल्ह्यातील गोधणी येथील २० एकर जागा नाममात्र दराने देण्यास मान्यता.

११. दगड या गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या दरवाढीपैकी स्थगित केलेल्या दरवाढीच्या रक्कमेसंदर्भात निर्णय.

१२. पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मान्यता.

आरोग्यविषयक वृत्त