Facebook वर जडले प्रेम म्हणून 12 लाखांची नोकरी सोडून आली इंडियात, आता करत आहे ‘हे’ काम

शिमला : वृत्तसंस्था – फेसबुकचा वापर मित्र बनवणे आणि मनोरंजन करण्यासाठी असतो. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत जिथे फेसबुकचा वापर खुपच चांगल्या कामासाठी करण्यात आला आहे. होय, मागील दोन वर्षापासून तुर्कीची राहणारी जुलेहा, कोटामध्ये मनसिक आजारी मुलांची देखरेख करत आहे. जुलेहा तुर्कीच्या अंकारा शहरात बारा लाख वार्षिक पॅकेजवर नोकरी करत होती.

याशिवाय तिचे वडील एक मोठे बिल्डर आहेत आणि तिचा भाऊ कॅनडामध्ये इंजिनियर आहे. एक दिवस जुलेहाचे एक फेसबुक फ्रेंड कलाकार सर्वेश हाडा यांनी तिला चॅटिंगदरम्यान मानसिकदृष्ट्या आजारी मुलांबाबत सांगितले होते. याची सुरूवात सुमारे दिड वर्षापूर्वी झाली होती.

होय, जुलेहा आगळ्या-वेगळ्या कलांचा शोध घेत-घेत कोटातील कलाकार सर्वेश हाडा यांच्या फेसबुक पेजवर पोहचली.

यानंतर दोघांमध्ये हळुहळु मैत्री होत गेली. जुलेहा तुर्कीत एका रिहेबिलेशन सेंटरमध्ये काम करत होती. तर कोटामध्ये सर्वेश सुद्धा मानसिकदृष्ट्या आजारी मुलांवर काम करत होते. याच वेळी कोटामध्ये मुलांच्या गायडन्ससाठी व्यवस्था नव्हती. म्हणून सर्वेशने जेव्हा ही गोष्ट जुलेहाला सांगितली तेव्हा ती ताबडतोब भारतात आली.

2015 मध्ये जुलेहाने सर्वेश यांच्याशी विवाह केला आणि त्यानंतर त्या गरजू कुटुंबातील मुलांची देखरेख करू लागल्या. याबाबत जुलेहा यांचे म्हणणे आहे की, त्या कोटामध्ये खुश आहेत. याशिवाय जुलेहाने जर्नी ऑफ बुकच्या वीजाने सुरू झालेले हे नवे जीवन मुलांना समर्पित केले आहे.