HSC Exam : ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्यातील इयत्ता 12 वीच्या परीक्षा अखेर रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इयत्ता 12 वीची परीक्षा (12th exam) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाची बैठकीत राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी 12 वीची परीक्षा (12th exam) रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. 10 वी प्रमाणे 12 वीच्या विद्यार्थ्यांचंही मूल्यमापन केलं जाण्याची शक्यता आहे. परंतु 12 वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसे केले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुकेश अंबानींचा मोठा निर्णय ! कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला 5 वर्ष सॅलरी अन् मुलांना शिक्षण देणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करुन परीक्षा घेणे चुकीचे आहे.
यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सर्वांची मते जाणून घेतली.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही.
जशी 10 वीची परीक्षा रद्द केली, त्याप्रमाणे 12 वी ची परीक्षा (12th exam) रद्द करावी, असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले.

पतांजलिच्या ‘कोरोनिल’वरुन न्यायालयाने बजावले समन्स; बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

निर्णय न्यायालयाला कळवणार

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याचा अंतिम निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार आज बैठक झाली यामध्ये 12 वीची परीक्षा (12th exam) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा निर्णय लवकरच न्यायालयाला कळवला जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे CBSE अन् ICSE बोर्डाला स्पष्ट आदेश, म्हणाले – ’12 वीच्या निकालासाठीचे निकष 2 आठवड्यात सांगा’

CET परीक्षेचा विचार होऊ शकतो

परीक्षा न घेता 12 वीच्या परीक्षेचा निकाल कसा लावायचा याचा फॉर्म्युला शिक्षण विभाग निश्चित करणार आहे.
इयता 9 वी, 10 वी व 11 वीच्या गुणांची सरासरी काढून निकाल देणे, हा एक पर्याय आहे.
परंतु गेल्यावर्षी 11 वीची परीक्षा झालेली नव्हती, ही अडचण आहे. तसेच पदवी प्रवेशासाठी सीईटीच्या पर्याचा विचार होऊ शकतो.

पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची, भाजप नेत्याची राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर जोरदार टीका

सर्वोच्च न्यायालयाचे CBSE अन् ICSE बोर्डाला स्पष्ट आदेश, म्हणाले – ’12 वीच्या निकालासाठीचे निकष 2 आठवड्यात सांगा’