सलमानच्या घरामध्ये बॉम्ब असल्याचा दावा, 2 तासात फुटणार असल्याबाबत युवकानं पोलिसांना मेल करून सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका 16 वर्षीय मुलानं नुकताच दावा केला की, सलमान खानच्या घरात बॉम्ब आहे. गाझियाबादमध्ये राहणाऱ्या या मुलानं बांद्रा पोलीस ठाण्याला ई-मेल करत याबाबत माहिती दिली. मेलमध्ये म्हटलं होतं की, “सलमान खानचं घर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बॉम्ब लावण्यात आला आहे. मेल पाठवल्याच्या 2 तासात हा ब्लास्ट होणार आहे. रोक सकते हो तो रोक लो.”

सलमानच्या घरी 4 तास सर्च ऑपरेशन
रिपोर्टनुसार हा मेल 4 डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांना मिळाला होता. मेल मिळताच पोलीस अधिकारी बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजल स्क्वाड (BDDS) घेऊन सलमानच्या घरी पोहोचले. यावेळी सलमान खान घरी नव्हता. पोलिसांनी घरातील सलमानचे पॅरेंट्स सलीम खान, सलमा खान आणि अर्पिता यांना याबाबत माहिती दिली. यानंतर घरात 4 तास सर्च ऑपरेशन करण्यात आलं. ब्रांदा पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यानंही याबाबत माहिती दिली आहे.

तपासानंतर समजलं की बॉम्बची गोष्ट खोटी होती. कोणीतरी पोलीसांना फसवलं होतं. तपासात समोर आलं की, मेल पाठवणारा मुलगा गाझियाबादचा आहे. पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच मुलगा फरार झाला. पोलीसांनी आरोपीच्या भावाला सगळी माहिती दिली आणि त्याला घरी येण्यास परावृत्त केलं. मुंबई पोलिसांनी त्याला बांद्रा पोलीस ठाण्यात स्वत:ला सरेंडर करण्यासाठी नोटीसही पाठवली. नंतर पोलीसांनी त्याला जुव्हेनाईल कोर्टात हजर केलं जिथून त्याला सोडण्यात आलं.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/