1984 Anti-Sikh Riots | शीखविरोधी दंगलीतील आरोपी काँग्रेस नेते सज्जन कुमार आणि इतर आरोपींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली : 1984 Anti-Sikh Riots | येथील राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीतील १९८४ च्या शीख विरोधी दंगलीदरम्यान सुलतानपुरी येथील एका प्रकरणात काँग्रेस नेते सज्जन कुमार आणि इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हे प्रकरण तीन शीखांच्या कथित हत्येशी संबंधित होते. (1984 Anti-Sikh Riots)

आजच्या या सुनावणीत न्यायालयाने सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र १९८४ शीख दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा यापूर्वीच सुनावण्यात आली असल्याने त्यांचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे. (1984 Anti-Sikh Riots)

१९८४ च्या दंगलीत एका जमावाचे नेतृत्व काँग्रेस नेते सज्जन कुमार करत असताना या जमावाने शीख पिता-पुत्र जसवंत सिंग आणि तरुण दीप सिंग यांची हत्या केली होती. जमावाने या बाप-लेकास जाळून टाकले होते. त्यांच्या कुटुंबियांना मारहाण देखील मारहाण केली होती.

यानंतर दिल्लीच्या सरस्वती विहार पोलिस ठाण्यात सज्जन कुमार यांच्यावर भादंवि कलम १४७, १४९, १४८, ३०२, ३०८, ३२३, ३९५, ३९७, ४२७, ४३६, ४४० अन्वये दंगल, खून आणि दरोडा यासारखे आरोप ठेवून गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सज्जन कुमार यांची चौकशी करून ६ एप्रिल २०२१ रोजी त्यांना अटक केली.

सध्या ते याच दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने १७ डिसेंबर २०१८ रोजी सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीनंतर दिल्लीत पाच शीख मारले गेले आणि एक गुरुद्वारा जाळण्यात आला.
या प्रकरणात सज्जन कुमार दोषी आढळल्याने त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.

का उसळी होती शीखविरोधी दंगल?
१९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीखविरोधी दंगल उसळली होती.
पंजाबमधील शीख दहशतवादाला दडपण्यासाठी इंदिरा गांधींनी शीखांचे पवित्र धार्मिक स्थळ सुवर्ण मंदिर परिसरात
ऑपरेशन ब्लूस्टार सुरू केले होते. ज्यामध्ये दहशतवादी भिंद्रनवालासह अनेक लोक मारले गेले होते.
या घटनेमुळे शीख समाजात संतापाचे वातावरण होते.

काही दिवसांनी इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली.
त्यानंतर देशभर शीखविरोधी दंगली सुरू झाल्या. दिल्ली आणि पंजाबमध्ये दंगलींचे प्रमाण खुपच जास्त होते.
या दंगलीत सुमारे साडेतीन हजार लोक मारले गेले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | गणेश भक्तांसाठी पुणे पोलिसांकडून ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ लाँच (व्हिडीओ)

Supriya Sule | अजित पवारांचा अपमान करण्यासाठी सोबत घेतलं का? पडळकरांच्या विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला थेट सवाल