Pune Police | गणेश भक्तांसाठी पुणे पोलिसांकडून ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ लाँच (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | पुण्यातील गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2023) जगभरात प्रसिद्ध आहे. पुण्यातील गणेश मंडळांनी तयार केलेले आकर्षक देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी देशभरातून आणि परदेशातून नागरिक पुण्यात येत असतात. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या गणेश भक्तांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी पुणे पोलिसांकडून मोठं पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) सर्वसमावेशक ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ (Ganeshotsav 2023 Digital Road Map) जारी केला आहे. यामुळे पुण्यात येणाऱ्यांना आपल्या लाडक्या बाप्पाजवळ पोहचणं सोपं होणार आहे.

‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ संदर्भात पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) म्हणाले, गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅपमध्ये महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे. त्यात शहरातील रस्त्यांबाबत माहिती देण्यात आली आहे. कोणते रस्ते बंद आणि कोणते सुरु याची माहिती सांगण्यात आली आहे. याशिवाय पर्याय मार्गांची देखील माहिती यामध्ये उपल्बध करुन दिली आहे.

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Pune Traffic Jam) होत असते. तसेच अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन चेंगराचेंगरी होते. त्यामुळे उत्साहात सुरु असलेल्या गणेशोत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता असते. त्यातच अनेक नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येतून सोडवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी हा रोड मॅप पुणे पोलिसांकडून (Pune Police) जारी करण्यात आला आहे.

रोड मॅपमध्ये पोलीस मदत कक्ष कुठे आहेत, याची माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे काही अनुचित प्रकार घडला तर नागरिकांना थेट आणि तात्काळ पोलिसांपर्यंत पोहचता येणं शक्य होणार आहे. त्यामुळे या मॅपचा वापर करा आणि सुरळीत आणि आनंदाने आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्या, असं आवाहन पुणे पोलिसांनी गणेश भक्तांना केले आहे.

https://x.com/PuneCityPolice/status/1704341070824513686?s=20

कुठे आहे पार्किंग व्यवस्था?

पुणे शहरात गणेशोत्सवकाळात अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील 26 ठिकाणी पार्किंग स्टँड उभारण्यात आले आहेत. 27 सप्टेंबर पर्यंत पोलिसांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी गाडी पार्किंग करता येणार आहे.

दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था खालील ठिकाणी करण्यात आली आहे…

 • न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग (40 दुचाकी)
 • देसाई महाविद्यालय (पोलिसांच्या वाहनांसाठी)
 • गोगटे प्रशाला (60 दुचाकी)
 • स.प. महाविद्यालय (120 दुचाकी)
 • शिवाजी मराठा विद्यालय (25 दुचाकी)
 • नातूबाग (100 दुचाकी)
 • सारसबाग, पेशवे पार्क (100 दुचाकी)
 • हरजीवन रुग्णालयासमोर, सावरकर चौक (30 दुचाकी)
 • पाटील प्लाझा पार्किंग (100 दुचाकी)
 • मित्रमंडळ सभागृह (30 दुचाकी)
 • पर्वती ते दांडेकर पूल (100 दुचाकी)
 • दांडेकर पूल ते गणेश मळा (300 दुचाकी)
 • गणेश मळा ते राजाराम पूल (400 दुचाकी)
 • विमलाबाई गरवारे हायस्कूल (100 दुचाकी)
 • आपटे प्रशाला (100 दुचाकी)
 • मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय (100 दुचाकी)
 • एसएसपीएमएस महाविद्यालय (120 दुचाकी)

मोटारींसाठी पार्किंग व्यवस्था खालील ठिकाणी करण्यात आली आहे…

 • शिवाजी आखाडा वाहनतळ (20 कार)
 • हमालवाडा, पत्र्या मारुती चौकाजवळ (50 कार)
 • नदीपात्रालगत (80 कार)
 • पीएमपी मैदान, पूरम चौकाजवळ (40 कार)
 • नीलायम टॉकीज (80 कार)
 • आबासाहेब गरवारे महाविद्यालय
 • संजीवन वैद्यकीय महाविद्यालय
 • फर्ग्युसन महाविद्यालय
 • जैन वसतिगृह, बीएमसीसी रस्ता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | हॉटेल व्यवसायिकाला महारहाण करुन खंडणी मागणाऱ्या अखिल उर्फ ब्रिटिश पालांडे टोळीवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 63 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA