‘कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता…’ : शिवराज सिंह चौहान

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरच्या माध्यमातून कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशात 1984 मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणात काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे कमलनाथ यांच्या मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाला भाजपाकडून विरोध करण्यात आला. दरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान यानंतर लगेचच काही वेळानंतर ते खुद्द कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला अावर्जून उपस्थित राहिले. शिवाय  त्यानंतर दुसरे ट्विट करत त्यांनी कमलनाथ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता…’ असे ट्विट शिवराज सिंह चौहान यांनी केले होते. त्यानंतर कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या शपथविधी सोहळ्याला शिवराज सिंह चौहान आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले. तत्पूर्वी  शिवराज सिंह चौहान यांनी 1984 मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला होता.

दरम्यान, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांनी म्हणून शपथ घेतली. याचबरोबर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुद्धा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला शिवराज सिंह चौहान यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

दुसरीकडे, आज दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणात दोषी ठरवल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले आहेत. गुन्हे सिद्ध झाल्याने सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय हत्या प्रकरणात मात्र सज्जन कुमार यांची मुक्तता झाल्याचे समोर आले आहे.

मुख्य म्हणजे 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणात काँग्रेस नेते कमलनाथ यांचेही नाव पुढे आले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे.

https://twitter.com/ChouhanShivraj/status/1074571513922228224

https://twitter.com/ChouhanShivraj/status/1074593357366624256

https://twitter.com/ANI/status/1074593480616353792