अच्छे दिन ! मे महिन्यातील महागाईचा दर मागील २२ महिन्याच्या तुलनेत सर्वात कमी, भाज्या झाल्या ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महागाई वाढल्याचे सांगितले जात असताना आता मोदी सरकार आणि सामान्य व्यक्ती यांना दिलासा देणारी एक आनंदची बाब म्हणजे मे महिन्यात महागाईचा दर कमी झाल्याची आकडेवारीत स्पष्ट झाले. मे महिन्यात महागाईचा दर (WPI) 2.45 टक्के राहिला आहे. हा स्तर मागील 22 महिन्यातील सर्वात कमी दर राहिला आहे. मे महिन्यात WPI महागाई दर 3.07 टक्क्यांवरुन 2.45 टक्क्यावर स्थिर झाला. एप्रिल 2018 मध्ये हाच दर 4.78 टक्के एवढा होता. महागाई संबंधित WPI ते अधिकृत आकडे समोर आली आहे.

खाद्य पदार्थ, इंधन याच्या किमतीत कमी आल्याने मूल्याधारित महागाई दर मे महिन्यात कमी झाला आहे. मे 2019 या महिन्यातील महागाई दर जून 2017 च्या महागाईत आलेल्या कमी नंतरचा सर्वात कमी दर आहे. जून 2017 साली WPI महागाई दर 1.88 टक्क्यांवर पोहचला होता.

खाद्य पदार्थांचा विचार केल्यास त्याचा एप्रिल मध्ये महागाई दर 7.37 टक्के होता, तर मे मध्ये तो 6.99 टक्के झाला. भाज्याचे महागाई दर मे महिन्यामध्ये कमी होऊन 3.15 टक्के झाला तर एप्रिलमध्ये हा दर 40.65 टक्के होता. बटाट्यांचा महागाई दर मे महिन्यात 23.36 टक्के होता तर एप्रिलमध्ये 17.15 टक्के होता.

इंधन आणि वीजच्या महागाईचा विचार केला. तर मे महिन्यात हा दर 0.98 टक्के राहिला. तर एप्रिल महिन्यात महागाई दर 3.84 टक्के राहिला. मॅन्युफॅक्चर वस्तूंचा दर देखील मे महिन्यात कमी झाला. एप्रिलमध्ये हा महागाई दर 1.72 टक्के होता तर मे महिन्यात हा दर 1.28 टक्के झाला.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेता प्रकाश राजने ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’